क्राईम

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला बॅगेत

नायगाव: वसईच्या नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे.

नायगाव पूर्वच्या परेरा नगर ते नायगाव रेल्वे स्थानक रस्त्याच्या कडेला खारफुटी झाडांमध्ये एक संशयित बॅग स्थानिकांना दिसली होती. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली. त्यावेळी बॅगेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीच्या पोटावर धारधार वस्तूने हल्ला केल्याच्या खुणा पोलिसांना दिसून आल्या आहेत.

या प्रकरणी वालिव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. मृतदेहाच्या स्थितीवरुन नुकतीच हत्या केल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला असून तिच्या शाळेच्या गणवेशावरुन मुलीचे नाव निष्पन्न झाले आहे. सदर मुलीची अंधेरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह बॅगमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्टेशन परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत ही बॅग सापडली. मृतदेहावर चाकूने वार केले होते. तिची हत्या करुन मृतदेह लपवण्यासाठी या झाडांमध्ये आणून टाकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

7 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago