क्राईम

मला पकडा सोडू नका असं स्वतःच ओरडू लागला चोर अन…

पाटणा: चोरी झाली की चोराला पकडा चोराला पकडा असं इतर लोक ओरडतात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात स्वतः चोरच मला पकडा, सोडू नका, धरुन ठेवा, असं ओरडताना दिसला.

ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करायला गेलेल्या या चोरट्यासोबत असं काही घडलं की तो प्रवाशांकडे आपल्या जीवाची भीक मागू लागला. सोशल मीडियावर ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्या या चोराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ट्रेनमध्ये मोबाईल चोरीची प्रकरण काही नवीन नाहीत. चालत्या ट्रेनच्या दरवाजा किंवा खिडकीतील प्रवाशांच्या मोबाईलवर चोरटे डल्ला मारतात.

प्रवासी कितीही सतर्क असले तरी चोरटे आपला डाव साधतातच. पण मोबाईल चोरीचा चोरट्यांचा हा प्रयत्न प्रत्येक वेळी यशस्वी होईलच असं नाही. अशाच मोबाईल चोराला प्रवाशांनी पकडलं आणि त्याला अशी भयंकर शिक्षा मिळाली की पाहून तुम्हालाही धडकी भरेल. फोटोत पाहू शकता चोर ट्रेनच्या खिडकीला लटकताना दिसतो आहे आणि ट्रेन सुसाट धावते आहे.

ट्रेनच्या आत चोराचे दोन्ही हात आहेत. दोन्ही बाजूंनी 2 प्रवाशांनी त्या चोराचा एक एक हात धरला आहे. चोरटा खिडकीबाहेर मोठमोठ्याने ओरडतो आहे. माझा हात सोडू नका, माझा हात सोडू नका असं तो सांगतो आहे. मोबाईल चोरायला आलेला चोर आपल्या जीवाची भीक मागतो आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

4 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

4 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

4 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago