तरनतारन (पंजाब): पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात एका विधी महाविद्यालयात घडलेल्या थरारक घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भर वर्गात एका विद्यार्थ्याने आपल्या सहाध्यायी विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वर्ग सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, प्रथम वर्षाची विधी शाखेची विद्यार्थिनी संदीप कौर (२०) आपल्या मैत्रिणीसोबत वर्गात बसली होती. त्याचवेळी प्रिन्स राज सिंग हा विद्यार्थी वर्गात आला. त्याने संदीपशी काही वेळ वाद घातला आणि अचानक पिस्तूल काढून तिच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच संदीप जागीच कोसळली.
घटनेनंतर काही क्षणांतच प्रिन्सने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकारामुळे वर्गातील इतर विद्यार्थी हादरले असून काहींना मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे.
एकतर्फी प्रेमातून घटना?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने विद्यार्थिनीला प्रपोज केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तिने प्रस्ताव नाकारल्याने संतापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
कुटुंबीयांचा आरोप
मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी महाविद्यालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. कॉलेजमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप करत त्यांनी जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालय परिसर सील केला असून शस्त्राचा उगम, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. आरोपीकडे पिस्तूल कसे आले, ते परवानाधारक होते की बेकायदेशीर, याचाही शोध घेतला जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे राज्यात शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…