मनोरंजन

बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा लव्ह अँगल! करण–प्राजक्तामध्ये वाढतंय नातं, रुचिताही भावनांमध्ये गुंतली

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.

बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी तुला कधीही सोडून जाईन. तुझ्यासोबत राहिल्यामुळे मी वीक दिसतोय.” तसेच मागील सीझनचा संदर्भ देत तो म्हणाला, “निक्कीला सपोर्ट केल्यामुळे अभिजीत जिंकला नाही.” विशालच्या या वक्तव्यामुळे घरातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, घरात आणखी एक नवा लव्ह अँगल सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. रुचिताने करणला विचारले की तन्वीचा लव्ह अँगल खोटा नव्हता, मात्र आयुषने तिला भाव दिला नाही. त्यावर करण राकेशशी बोलताना प्राजक्ताबद्दल म्हणाला, “आमच्यामध्ये केवळ मैत्री असेल, लग्न असेल… आम्ही स्वतंत्र खेळतो.” यावर राकेशने करणला सल्ला दिला, “तू तिला जप, तिच्या भावना सांभाळ.”

यानंतर करण भावूक झाल्याचे दिसले. तो प्राजक्ताला म्हणाला, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट झालो नाही. मला कधीच कोणाची इतकी काळजी वाटली नाही. पण तुझी काळजी वाटतेय. इथं पहिल्यांदा काहीतरी फिल झालंय. आयुष्यात काहीच नव्हतं, पण आता काहीतरी सुरू झाल्यासारखं वाटतंय.”

करणने पुढे कबूल केले की तो भावनांबद्दल बोलणं टाळत होता, कारण त्याला इमोशनल व्हायचं नव्हतं. मात्र प्राजक्ताने त्याला समजावत सांगितले, “एवढा विचार करू नकोस. बिग बॉसनंतरचं आयुष्यही महत्त्वाचं आहे. लोक सगळं लक्षात ठेवतात, आपण जज होऊ.”

या सगळ्या घडामोडींमुळे बिग बॉसच्या घरातील नात्यांची समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत चालली आहेत. पुढील भागात या नव्या लव्ह अँगलचा खेळावर काय परिणाम होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

16 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

17 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

17 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago