क्राईम

श्रीगोंदा तालुक्यात जोडप्याला गंभीर मारहाण करत घरफोडी

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील मोहिते मळ्यात शनिवारी (दि 20) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ३ ते ४ चोरट्यांनी किचनच्या दरवाज्याची कडी कोंयडा तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसहीत सुमारे ३ लाख ४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच चोरांची चाहुल लागल्याने आरडाओरडा करणाऱ्या महिलेस तिच्या पतीसह मारहाण करत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली असुन याबाबत सुभाष नारायण मोहिते यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद केली आहे.

श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव येथील मोहितेमळा परिसरात राहणाऱ्या सुभाष मोहिते यांच्या घरात शनिवारी (दि.२०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन ते चार चोरटे किचनच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडत घरात घुसल्याचे मोहिते यांच्या पत्नीला समजले त्यावेळी त्यांनी मोहिते यांना आवाज देत जागे केले असता चोरट्या पैकी एकाने मोहिते यांच्या पत्नी सुवर्णा यांच्या दंडावर जोरदार फटका मारल्याने त्या जोरात ओरडल्याने मोहिते यांनी उठण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्यापैकी दुसऱ्याने हातातील लोखंडी गजाने मोहिते यांच्या डोक्यात तसेच पाठीवर, हातावर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी करत घरातच झोपलेल्या मुलाच्या खोलीला बाहेरुन कडी लावली.

त्यानंतर चोरट्यांनी देवघरातील कपाटात असलेले रोख २ हजार ४५० रुपये, ७६ हजार १९५ रुपयांचे सोन्याचे शॉर्ट गंठन, २६ हजार ६०० सोन्याची ठुसी, १ लाख ११ हजार ९० रुपयांचे सोन्याचे गंठन, २८ हजार ५६० रुपयांचे सोन्याचे फॅन्सी पेंडंट, ९ हजार ३१० रुपयांची सोन्याची अंगठी, ३० हजार ५५५ रुपयांचे सोन्याचे फॅन्सी झुबे, १० हजार २२० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे मणी आणि ६ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या घटनेत सुभाष नारायण मोहिते आणि सुवर्णा सुभाष मोहिते हे दोघेही गंभीर जखमी झाले असून दवाखान्यात उपचार घेत आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सुभाष नारायण मोहिते यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर अभंग यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनस्थळी भेट देऊन पाहणी करत श्वान पथकास पाचारण केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

12 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago