क्राईम

धामारीत बेल्हा जेजुरी महामार्गावर भीषण अपघात

अपघातात माय लेकांसह तिघांचा मृत्यू तर टेम्पो चालक जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) सह येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना आज रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून संकेत दिलीप डोके, विजया दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे असे मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.

धामारी (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरून संकेत डोके हा त्याची आई व एका मित्रासह त्याच्या ताब्यातील एम एच १४ एच आर ७०७३ या दुचाकीहून धामारी बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असताना शिक्रापूर बाजूने आलेल्या एम एच १४ जि यु ६८८० या टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला.

टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाल्याने दुचाकी वातील तिघांना गंभीर मार लागल्याने संकेत दिलीप डोके (वय २०), विजया दिलीप डोके (वय ४०), ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २०) तिघे रा. खडकवाडी ता. आंबेगाव जि. पुणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

घडलेल्या घटनेबाबत संपत चंदर डोके (वय ४५) रा. खडकवाडी ता. आंबेगाव जि. पुणेयांनी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक अक्षय बबन साकोरे रा. चांडोली राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

5 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago