शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची काही तासांत धडाकेबाज कामगिरी
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात उभ्या असलेल्या युवकांवर पिस्तुल मधून गोळीबार करुन फरार झालेल्या अज्ञात युवकाला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने चक्क अठ्ठेचाळीस तासात पिस्तुलसह जेरबंद केले असून ज्ञानेश्वर नामदेव कोकरे असे पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात रोहन पाठक व अजय चव्हाण हे दोघे उभे ३१ जानेवारी २०२३ रोजी उभे असताना एका युवकाने दुचाकीहून येवून दोघांना दमदाटी करत रोहन पाठक या युवकावर पिस्तुल रोखून गोळीबार करत गोळ्या घालण्याची धमकी देऊन पळून गेला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांसह आदी पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घटनास्थळी पिस्तुलची पुंगळी मिळून आली.
सदर घटनेबाबत रोहन राकेश पाठक (वय २३) रा. पाटवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हे दाखल केले तर पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, जयदीप देवकर, लखन शिरसकर यांना या गुन्ह्यातील वर्णनाचा युवक तसेच दुचाकी सणसवाडी येथील स्वप्न शिल्प सोसायटी मध्ये असल्याची माहिती मिळाली त्यांनतर पोलिसांच्या पथकाने सणसवाडी येथे जात पाहणी केली असता गुन्ह्यातील दुचाकी व युवक तेथे मिळून आला, तर पोलीस पथकाने घरात झडती घेतली असताना त्यांना युवकाजवळ एक पिस्तुल देखील मिळून आले.
दरम्यान पोलिसांनी ज्ञानेश्वर नामदेव कोकरे (वय ३४) रा. स्वप्न शिल्प सोसायटी सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. न्हावरा (ता. शिरुर) जि. पुणे याला अटक करत आज शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…