महाराष्ट्र

प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले…

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि राजा कोण?’ याचे उत्तर जनतेने दिले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याबद्दल काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फटाक्यांची आतषबाजी करत विजय साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोतलाना नाना पटोले म्हणाले की, पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

नागपूर हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा बालेकिल्ला आहे पण याच बालेकिल्ल्यात काँग्रेसने मागील वर्षी पदवीधरच्या निवडणुकीत पराभूत केले, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाची धूळ चारली. विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेस विचाराची राहिली आहे. विदर्भाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करेल. भाजपाने या निवडणुकीत सर्व काही ठरवून केले, सत्तेचा दुरुपयोग केला. जो जिंकला तो आपला अशी भाजपाची भूमिका आहे.

नाशिकमध्ये काँग्रेसचे घर फोडण्याचे पाप भाजपाने केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करुन नाही. नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला, सत्यजित तांबेला उमेदवारी द्या असे त्यांनी सांगितले असते तर आम्ही उमेदवारी दिली असती. डॉ. सुधीर तांबे यांनी फार्म भरताना घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप आहे. नाशिकच्या संदर्भात हायकमांडच निर्णय घेईल, असेही नाना पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

9 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago