शिरूर तालुका

युवकांकडून कळसूबाई शिखर सर करत नववर्षाचे स्वागत

शिरुर तालुक्यातील युवकांकडून नववर्षानिमित्त अनोखा संकल्प

शिक्रापूर (शेरखान शेख): नववर्षाचे स्वागत प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या उपक्रमाचा संकल्प करुन करत असताना शिरुर तालुक्यातील काही युवकांनी गड किल्ल्यांना भेटी देण्याच्या संकल्प करत चक्क 3 तासात महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले आहे.

करंदी (ता. शिरुर) सह जातेगाव येथील काही युवकांनी नववर्षाच्या सुरुवातीला गड किल्ले सर करण्याचा संकल्प केला. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे सचिव हमीद पठाण, गोरक्ष ढोकळे, शरद उमाप, सुरेश नप्ते, नितीन गवळी, दिगंबर नप्ते, उल्हास क्षिरसागर, बंटी पवार, सोहेल पठाण यांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी आपला मोर्चा कळसूबाई शिखराकडे वळवला त्यानंतर सकाळी 6 वाजता शिखरावर चढाई करत 3 तासात कळसूबाई शिखर सर करुन नववर्षाचे स्वागत केले.

याबाबत बोलताना प्रत्येक महिन्यात 1 ते 2 गड किल्ल्यांना भेटी देत युवकांमध्ये गड किल्ल्यांची आवड निर्माण करणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार व राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे सचिव हमीद पठाण यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

4 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

4 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago