औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील नामवंत शाळेत कार्यरत असलेल्या 55 वर्षीय शिक्षिकेला त्यांच्याच माझी विद्यार्थ्याने आपण कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे म्हणत तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे, असे या माजी विद्यार्थ्याचे नाव आहे.
शिक्षिकेने त्याला ॲपलचा मोबाइल व लॅपटॉपविषयी विचारणा करुन ऑर्डर दिली. त्यासाठी पृथ्वीराजने 40 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही, असे म्हणून 50 हजार मागितले. डिस्काउंट जरा कमी झाला म्हणून 11 हजार अजून पाठवा, अशी विविध कारणे सांगून त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षिकेला संशय आला.
काही दिवसांनी पृथ्वीराज मोबाइल बंद करुन फरार झाला. यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे शिक्षिकेच्या लक्षात आले. यानंतर शिक्षिकेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्दा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…