शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व देवाच्या मूर्ती सह आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील दिगंबर दरेकर हे व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे राहण्यास असून 8 नोव्हेंबर रोजी दरेकर हे घराला कुलूप लावून पुणे येथे गेलेले होते. 14 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास दरेकर यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले त्यांनी याबाबत दरेकर यांना माहिती दिल्याने दरेकर यांनी घरी येत पाहणी केली असता घरातील कपाट उघडे असल्याचे तसेच कपातील 25 हजार रुपये, देवाची चांदीची मूर्ती तसेच कपाटातील साड्या व आदी साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत दिगंबर जयसिंग दरेकर (वय ६५) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. केदारे नगर वानवडी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…