क्राईम

वाडा पुनर्वसनचा माजी उपसरपंच माळीवर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच सचिन उर्फ चंद्रशेखर माळी याच्या विरुद्ध मित्राची कार घेऊन जाऊन मित्राची फसवणूक केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 महिने पोलिसांना गुंगारा देऊनही पोलिसांनी त्याला अटक केली असताना आता सचिन माळी याने कोरेगाव भीमा येथील एका व्यक्तीची कार घेऊन जाऊन त्याची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोल्सिंनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी याच्या विरुद्ध फसवणुकीचा पुन्हा दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच सचिन उर्फ चंद्रशेखर माळी याने यापूर्वी त्याचे मित्र असलेले बाळासाहेब लांडे यांची एम एच १२ एच के ६६७७ की स्कोर्पिओ कार घेऊन जाऊन लांडे यांना कार परत न देता फसवणूक केल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र 6 महिन्यांनी पोलिसांनी सचिन माळी याच्या मुसक्या आवळल्या.

नुकतेच कोरेगाव भीमा येथील महेश कुलकर्णी यांनी देखील फिर्याद दिली असून माळी हा कुलकर्णी यांची एम एच १२ डी ई १९१२ हि सेन्ट्रो कार ऑक्टोबर २०१९ मध्ये काही कामानिमित्त घेऊन गेला, त्यांनतर वारंवार विनंती करुन देखील सचिन माळी याने कुलकर्णी यांची कार आणून दिली नाही, त्यामुळे सचिन माळी हा मित्रांच्या कार घेऊन जाऊन काहीतरी दुरुपयोग करत असल्याचे लक्षात आल्याने महेश सुरेश कुलकर्णी (वय ४३) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन सीताराम माळी रा. वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध फसवणूक प्रकरणी पुन्हा गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

17 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

18 तास ago