शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील प्रदीप सरोदे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर विलास भाउ देशमुख रा. अंबोली ता. खेड यांची पार्क केलेले जेसीबी मशिन 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत जेसीबी ड्रायव्हर जितेंद्र संजय पठारे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला जेसीबी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १६) मार्च रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास विलास भाऊ देशमुख यांच्या नावावर असणारे जेसीबी मशीन नं. एम.एच १४ एच डब्ल्यू ९९७६ हे मशीन सुभाष जगताप यांचे सांगण्यावरून करडे येथे कंपनीत कामाला लावण्यासाठी आणले होते. परंतु सुभाष जगताप यांनी सांगितले की कंपनीत जागा नाही तुम्ही दोन दिवस मशीन प्रदिप सरोदे यांच्या इंडीयन ऑईल पेट्रोल पंप करडे या ठिकाणी लावा, असे सांगितल्याने जेसीबीचे ड्रायव्हर जितेंद्र पठारे यांनी सदरचे जेसीबी मशीन हे प्रदिप सरोदे यांचे इंडीयन ऑईल पेट्रोल पंप करडे या ठिकाणी लावून ते त्यांच्या घरी गेले होते.
पुन्हा (दि. 18) मार्च रोजी जेसीबीचे ड्रायव्हर जितेंद्र पठारे दुपारी ३.३० वाजल्याच्या सुमारास करडे येथे जेसीबी मशीन लावलेल्या पेट्रोल पंपावर आले असता तेथील मुलाने त्यांना सांगीतले कि (दि. 1७)मार्च रोजी सांयकाळी ७.०० वा. सुमारास कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी तुमचे जेसीबी मशीन घेवुन गेले आहे. म्हणुन त्या अनोळखी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण हे करत आहे.
शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून शिरूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून ह्या चोऱ्या होताना दिसून येत आहे. शिरूर पोलिस या चोरांना कधी गजाआड करतात याकडे शिरूरकंराचे लक्ष लागून राहीले आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…