शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे -नगर रोडवर विजय बाळासाहेब रानवडे रा जि. प. शाळेजवळ नांदे, पो.लवळे ता. मुळशी याने त्याच्या ताब्यातील टाटा झेस्ट कंपणीची कार दारू पिवून भरधाव वेगाने चालवून पुढे चालणाऱ्या टुव्हीलरला पाठीमागून जोरदार धडक देवून टुव्हीलरवरील निलेश हैबती विटे, शिवाजी अरून जवळगे (रा. प्रितम प्रकाशनगर, शिरूर) यांच्या डोक्याला, हाताला, पायाला लहान मोठया गंभीर दुखापती झाल्याने त्या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रताप बबनराव महाजन साठे यांनी त्या दोघांच्या मृत्यूप्रकरणी विजय बाळासाहेब रानवडे यांच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की. (दि. १८) मार्च रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सरदवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीत शिवनेरी हॉटेल समोर पुणे ते अहमदनगर हायवे रोडने निलेश हैबती विटे व त्याचा मित्र शिवाजी अरून जवळगे हे त्यांच्या ताब्यातील हिरो होन्डा स्पेलेन्डर कंपनीची मोटारसायकल क्रं. MH- १२EK९४६२ वरून प्रवास करत असताना टाटा झेस्ट कंपणीची कार MH १२ NU ४९६५ वरील चालक विजय बाळासाहेब रानवडे हयाने दारू पिवुन दारूच्या नशेत रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात कार चालवून मोटार सायकलला पाठीमागुन जोराची धडक मारून अपघात झाला.
या अपघातात निलेश विटे आणि त्याच्या पाठीमागे बसलेला शिवाजी जवळगे याच्या दोन्ही हाताला, पायाला, डोक्यास, कमरेला व मणक्याला लहान मोठया दुखापती झाल्याने त्यांचा मृत्यू झाला व त्याच्या स्वतःच्या हातास दुखापती झाल्या असून दोन्ही वाहनांची नुकसान झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस ऊपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…