पुणे: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने थेट आपल्या मुलाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली असून, भरवस्तीत घडलेली ही हत्या आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट पाहून पोलीसही चक्रावून गेले होते.
काय आहे प्रकरण?
या घटनेतील मृताचे नाव मुंजा धोंडिबा नरहरे (वय २५) असे असून, मुख्य आरोपी उषा नानासाहेब चव्हाण (वय ४०) हिच्याशी त्याचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात वाद वाढले होते. मुंजा हा उषाला वारंवार शारीरिक मारहाण करत तसेच मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे उषा प्रचंड तणावाखाली होती. अखेर या छळातून मुक्त होण्यासाठी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
मुलाने रचला खुनाचा कट
उषाने आपला त्रास पुणे शहरात काम करणाऱ्या आपल्या मुलगा निखिल चव्हाण (वय २१) याला सांगितला. आईवर होत असलेला अन्याय समजताच निखिलचा संताप अनावर झाला. त्याने आपल्या आईला या छळातून मुक्त करण्यासाठी मुंजाची हत्या करण्याचा कट रचला. या कटात त्याने आपला मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेतले. ७ जानेवारी रोजी या तिघांनी मिळून हत्येची योजना प्रत्यक्षात उतरवली.
कशी केली हत्या?
योजनेनुसार ७ जानेवारी रोजी उषाने मुंजाला चाकण येथे भेटायला बोलावले. त्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी त्याला दुचाकीवर बसवून मद्यपानासाठी नेले. दारू पिल्यानंतर संधी साधून दोघांनी मुंजावर चॉपरने सपासप वार केले. जागीच त्याचा मृत्यू झाल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी दगडाने त्याचा चेहरा ठेचला. इतकेच नव्हे तर त्याच्याकडील मोबाईल फोन व ओळखपत्रही घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. ११ जानेवारी रोजी चाकण दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंजाचा मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांनी असा लावला शोध
उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगारांकडे चौकशी सुरू केली.
घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची थोटके आढळून आल्याने तपासाची दिशा ठरली. तपासात खराबावाडी येथील एका दुकानातून ७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता तीन तरुणांनी दारू खरेदी केल्याची माहिती मिळाली. याच धाग्यावरून पोलिसांनी स्वप्नील पारधी याच्या दुचाकीचा शोध घेतला आणि अखेर संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांनाही अटक केली असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…