औरंगाबाद: पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरले असून एकाच वेळी रस्त्यावरील दोन भिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे नेहमीच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या आणि औरंगाबादची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या बाजूला दोन्ही खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात हत्येच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत एकामागून एक असे तीन खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा एकाचवेळी दोघांची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हत्या करण्यात आलेले दोन्ही व्यक्ती रस्त्यावर भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मध्यरात्री हे खून झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. तर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
औरंगाबाद शहराच्या घाटी परिसरात झालेल्या खुनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…