क्राईम

न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच वाल्मिक कराडने मोठा निर्णय घेतला

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल (22 जुलै) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. तसेच आता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मागील झालेल्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी त्याला जोरदार विरोध केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे.

काल सुनावणीत काय काय घडल? उज्जवल निकम यांनी सर्व सांगितलं

वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं. याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज काल न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा देखील अर्ज केला. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारा विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे असा विनंती अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जे दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहे. आरोप पत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता. न्यायालयाने अर्ज फेटाळावे अशी देखील आम्ही मागणी केली आहे. आता 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.

वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले

वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर उच्च न्यायालयात दाद मागणार, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले. वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले. तर वाल्मीक कराडचा जामीन अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सर्व आरोपींच्या वकिलांकडून दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संपत्ती जप्तीबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. आम्ही जे बँक खाते गोठवण्यात आले. त्यावरील निर्बंध उठविण्याबाबत बाजू मांडली. याबाबत सुनावणी झाली. पुढील तारखेला याबाबत न्यायालय निर्णय देईल, असं विकास खाडे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago