crime
पुणे: वाघोली परिसरात प्रेमप्रकरणातून प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
प्रेयसी आणि प्रियकर दोघे राहत असलेल्या फ्लॅटमध्ये प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वाघोलीमध्ये प्रेम प्रकरणातून एकाचा त्याच्याच प्रेयसीने खून केला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघे मागील काही महिन्यांपासून राहत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास हा युवक रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी युवकाला उपचारासाठी रुग्णालायात हलवले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या सर्वांगावर वार केले होते. दरम्यान या घटनेत प्रेयसीही जखमी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…