औरंगाबाद: आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे.
दंड व शिक्षा
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींना ‘आई – वडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम २००७’ च्या कलम २४ नुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा ५००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कायद्यातील तरतूद
जे ज्येष्ठ नागरिक स्वत:चे पलानपोषण करण्यास समर्थ नाही ते त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’च्या कलम १२५ नुसार ज्येष्ठांना त्यांच्या मुलांकडून स्वत:च्या पालनपोषणासाठी पोटगी मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पोटगीची ही रक्कम मुलांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांचे उत्पन्न व त्याच्या परिवाराचा खर्च विचारात घेऊन न्यायालय पोटगीची रक्कम ठरवीत असते.
हे करू शकतात पोटगीसाठी अर्ज…
या कायद्याखाली स्वत: ज्येष्ठ नागरिक अथवा पालक, जर ते असमर्थ असतील तर त्यांनी अधिकार दिलेली व्यक्ती किंवा संस्था अर्ज करू शकते. अथवा न्यायाधिकरण स्वत: त्याची दखल घेऊ शकते. मुलगा किंवा नातेवाइकांनी न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषणासाठी ठरवून दिलेली रक्कम अदा केली नाही तर न्यायाधिकरण आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्वत: फौजदारी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करते.
वाघोली (प्रतिनिधी) लोणीकंद-थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मालवाहू कंटेनर आणि इको कार…
शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडी येथे आज रविवार (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय युवतीसोबत…
शिंदोडी (तेजस फडके) करडे-रांजणगाव गणपती अष्टविनायक महामार्गाच्या कडेला पडीक जमिनीत रात्रीच्या वेळेस भंगारा (क्रॅप) मधील…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात…
शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची…