क्राईम

वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या…

पुणे : वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून एका रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी रिक्षाचालकाला आधी कारने जोरदार धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लोखंडी पाईपने डोक्यातवर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. वाघोली पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी नामदेव बाळासाहेब आळनुरे (वय २९, रा. परभणी), कैलास सुधाकर होरे (वय ३२, रा. खराडी, पुणे), बालाजी सोनाजी घनवटे (वय २२, रा. परभणी), अनिल सोपान घनवटे (वय २९, रा. आव्हाळवाडी, हवेली), नितीन लक्ष्मण उमाप (वय २१, रा. वाघोली), रोहन रामचंद्र वाघमारे (वय २२, रा. येरवडा) अर्जुन ज्ञानेश्वर शेलार (वय २०, रा. भावडी रोड, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नवनाथ सोन्नर याचे आरोपींपैकी एकाच्या नातेसंबंधातील महिलेसोबत अनैतिक संबंध होते. आरोपींनी नवनाथला वारंवार बजावून हे संबंध तोडण्यास सांगितले होते. मात्र, नवनाथने त्याकडे दुर्लक्ष केले. याच रागातून आरोपींनी गुरुवारी (ता. २४ सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास नवनाथला वाघोलीतील बाजारतळ मैदानावर भेटण्यासाठी बोलावले.

नवनाथ मैदानात पोहोचून कारच्या जवळ येताच आरोपींनी क्रूरपणे हत्या केली. आरोपींनी आपल्याकडील स्वीफ्ट कारने नवनाथला जोरदार धडक देऊन जमिनीवर पाडले. खाली पडलेल्या नवनाथला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी पाईपने थेट डोक्यात वार करून त्याला जागीच ठार केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी शिताफीने चौफेर वेढा घालून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक शहादेव हवाले करत आहेत.

वाघोलीत लग्नसमारंभादरम्यान नवरीसोबतच झालं मोठं कांड…

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

वाघोली येथील शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

21 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

22 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

22 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

22 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

22 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

22 तास ago