dead

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

क्राईम

वाघोली : वाघोली-भावडी रस्त्यावरील एका नामांकित सोसायटीमध्ये युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सारा लालमन अंधारे (वय १८, मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सारा ही गेल्या वर्षभरापासून आपल्या आईसह वाघोली येथील मामाच्या घरी राहत होती. ती अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ती लिफ्टने इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या ‘रिफ्युज गॅलरी’मध्ये गेली. तिथे तिने आपली चप्पल काढली आणि थेट खाली उडी घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या साराला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, साराने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा निष्कर्ष काढला जात आहे, मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

वाघोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. साराच्या कुटुंबियांकडे आणि मित्रांकडे चौकशी केली जात आहे. युवतीनेअशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कात्रजमध्ये भीषण अपघात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

न्हावरेत किराणा दुकान फोडून धाडसी चोरी; चोरटा सिसीटिव्ही मध्ये कैद 

शिरुर; शिक्षकाचे अपहरण, गावोगावी फिरवत, बेदम मारहाण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)