क्राईम

तळेगाव ढमढेरे नजिक कारच्या धडकेत पत्नी ठार पती जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) नजिक पिंपरी सांडस रस्त्याच्या कडेला पांढरी वस्ती येथे दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात जयश्री शिवाजी गरुड ही महिला ठार तर शिवाजी तुकाराम गरुड हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील तळेगाव ढमढेरे ते पिंपरी सांडस रस्त्याने शिवाजी गरुड व जयश्री गरुड हे दांपत्य त्यांच्या एम एच १२ के जी ९४९१ या दुचाकी वरुन चाललेले असताना ते पांढरी वस्ती येथे एका हॉटेल समोर थांबलेले असताना पिंपरी सांडस बाजूने एम एच १२ ई एम ३०३१ कार भरधाव वेगाने आली. यावेळी दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील शिवाजी गरुड व जयश्री गरुड हे दोघे गंभीर जखमी झाले.

दरम्यान कार चालक कार जागेवर सोडून पळून गेला, तर जवळील नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात पाठवले यावेळी जखमी जयश्री गरुड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारसाठी पुणे येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी जयश्री गरुड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेत जयश्री शिवाजी गरुड (वय ५०) रा. धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे ही महिला ठार झाली तर शिवाजी तुकाराम गरुड (वय ५५) रा. धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे हे गंभीर जखमी झाले.

याबाबत राजेअमरसिंह राजेंद्र ढमढेरे (वय २२) रा. धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एम एच १२ ई एम ३०३१ या कार वरील अज्ञात चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago