crime
पुणे : वाघोली येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे . अत्याचाराबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता.
फिर्यादी यांचा 10 वर्षीय मुलगा हा वाघोलीमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत आहे. 19 एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला शाळेमध्ये सोडल्यानंतर आरोपीने पीडित मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्याशी गोड बोलून त्याला ‘तूला चित्रपट आवडतात का?’असे विचारले. पीडित मुलाने हो उत्तर दिल्यानंतर आरोपीने टॉयलेटमध्ये चल… मी तुला एक फिल्म दाखवतो असे म्हटले. पीडित मुलाने त्यांना नकार दिला. मात्र आरोपीने ‘इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही” असे सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागला.
आरोपीच्या या कृतीला घाबरून पीडित मुलगा पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन “तुला इथेच फिल्म दाखवतो” असे बोलून मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…
वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…
वाघोलीत गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ अन्…
वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…
वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…