क्राईम

शिरुर शहरात गळफास घेऊन महीलेची आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सुरजनगर येथिल भाग्यश्री रामेश्वर दामुवाले (वय २७) या महीलेने राहत्या घरी हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) रोजी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास रामेश्वर दामुवाले व त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर दामुवाले हे जेवण ऊरकून घरातील बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते. नंतर भाग्यश्री ही मुलांना घेवून हॉलमध्ये झोपली होती. त्यानंतर (दि. २१) फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास रामेश्वर दामूवाले यांना त्यांचा लहाण मुलगा आयांश हा रडत असल्याने त्यांना जाग आली.

त्यावेळी त्यांनी हॉलमध्ये येवून पाहीले असता त्यांना त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर दामुवाले हिने ओढणीच्या सहाय्याने हॉलमधील फॅनला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी शेजारी राहणारे सिमाताई पठारे, संजय तरटे, सचिन चाबुकस्वार, गजानन ढोमणे यांना आवाज देवून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या मदतीने भाग्यश्री रामेश्वर दामुवाले हीला खाली घेवून तिला उपचाराकामी वेदांता हॉस्पीटल शिरूर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले आहे.

याबाबत रामेश्वर दामुवले यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मांडगे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…

7 तास ago

ऍलर्जीक खोकला लक्षणे व त्यावरील उपाय

ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…

8 तास ago

भारतीयांमध्ये का वाढतंय, हृदयाच्या आजारांचं प्रमान

भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…

8 तास ago

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

22 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

22 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

22 तास ago