क्राईम

जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नियमित व्यायाम करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावात असलेल्या एका जीममध्ये जात होते. ते नियमितपणे नसले तरी अधूनमधून व्यायाम करत होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जीममध्ये व्यायाम केला. त्यानंतर ते एका ठिकाणी बसले आणि त्यांनी पाणी प्यायले. मात्र, काही सेकंदांतच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले.

या प्रकारानंतर जीममधील इतर लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी स्वतः एक डॉक्टर आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राची संपूर्ण माहिती असतानाही त्यांच्या पतीवर अशी वेळ आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी पूर्ण आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी आणि तपासणी करूनच कोणताही व्यायाम करावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago