महाराष्ट्र

महायुती सरकारमध्ये मोठी खळबळ! अंजली दमानियांनी आणखी एका मंत्र्यांची कुंडली काढली

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम यांच्या नावांचा समावेश होता. एकीकडे हे आरोप सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हेही वादात सापडले.

आता महायुती सरकारमध्ये खातेबदल करत माणिकराव कोकाटेंना दणका दिल्यानंतर महायुती सरकारची पुन्हा एकदा धडधड वाढण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी शुक्रवारी (ता. 1 ऑगस्ट) एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण महायुतीतील आणखी एका मंत्र्‍यांची कुंडली काढली असल्याचा दावा केला आहे. यामुळे महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या, योगेश कदम यांच्याविरोधात माझ्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. कदम यांची सगळी कुंडली काढली असून हे सर्व पुरावे घेऊन आपण त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असंही दमानिया यांनी इशारा दिला आहे.

त्या म्हणाल्या,योगेश कदम यांच्या योग सिद्धी, सिद्धयोग इत्यादी नावाच्या ज्या काही कंपन्या आहेत, त्याची सर्व माहिती घेतली आहे. तसेच त्यांचे ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरु आहेत, याव्यतिरिक्त रत्नागिरीत त्यांच्या ज्याकाही शैक्षणिक संस्था चालतात त्याचीही माहिती काढल्याचंही दमानिया म्हणाल्या.

या सगळ्या कंपन्या आणि संस्थांमधील मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार माझ्यापर्यंत आला आहोत. हे सर्व एकत्र करुन आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत”, असे अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप परब यांनी विधानपरिषदेत केला होता. परब यांनी यावेळी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबईच्या कांदिवली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत 22 बारबालांसह 22 ग्राहक व 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.

गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत,असंही परब यांनी म्हटलं होतं. यानंतर आता योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना त्यांनी ॲार्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबियांनी ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे. याचवरुन आता यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago