पानिपत (हरियाणा): पानिपत जिल्ह्यातील इसराना गावात 15 ऑगस्ट रोजी एक आश्चर्यदायक घटना घडली आहे. ओमप्रकाश (वय ८०) यांनी एक महिना अगोदरच आपल्या मृत्यूची केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत ठरली आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ओमप्रकाश यांनी सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ लोकांना सांगितल्याचं नातेवाईकांचे म्हणणं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ओमप्रकाश यांचा मृत्यू त्यांनी सांगितलेल्या वेळीच झाला. नऊ महिने आईच्या उदरात राहिल्यानंतर मानवाचा जन्म होतो. तसेच मृत्यूच्या नऊ महिने अगोदर अशा घटना घडू लागतात, त्यावरुन मृत्यू जवळ आल्याचे समजत असते, असे म्हटले जाते. मात्र, ही चिन्हं इतकी लहान असतात की आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
ओमप्रकाश यांचा मृत्यूचा दावा ग्रामस्थांनी विनोद म्हणून घेतला होता. पण भविष्यवाणीच्या दिवशीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे. ओमप्रकाश यांचा मृत्यूबाबतचा दावा आता लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ओमप्रकाश यांना मृत्यूचा दिवस आणि वेळ माहित होती, त्यामुळे त्यांनी लोकांना शिवपुरीच्या आसपासचा परिसर अनेक दिवस आधीच स्वच्छ करण्यास सांगितले होते.
मृत ओमप्रकाश यांच्या पुतण्याने सांगितले की, ‘ओमप्रकाश हे खूप दिवसांपासून आजारी होते. पण ते जे काही बोलले ते खरं ठरेल, असे कुटुंबीयांना वाटले नव्हते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूची नेमकी वेळ आणि दिवस कसा कळणार? असा प्रश्न आम्हाला पडला होता. अनेक दिवसांपूर्वी ओमप्रकाश काका यांनी 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आपला मृत्यू होणार असल्याचे सांगितले होते आणि तेव्हा आम्ही मस्करीत घेतलेली ती गोष्ट आज खरी ठरली आहे.’
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…