मनोरंजन

स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी पुन्हा मालिकेत

मुंबई: स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी’ ही नवी मालिका येणार असून तिचा पहिला प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

या प्रोमोमधून मालिकेतील मुख्य कलाकारांची झलक समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.

‘आनंदी’ या मालिकेत अरुण नलावडे हे आनंदीच्या आजोबांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पात्राचे नाव आत्माराम जाधव असे आहे. तर समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज कलाकार बर्‍याच काळानंतर पुन्हा मालिकांच्या विश्वात पुनरागमन करत आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना समीर धर्माधिकारी म्हणाले की, “स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका आहे. जवळपास सात वर्षांनंतर मी पुन्हा मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मी युगंधर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. काम म्हणजे त्याच्यासाठी धर्म असून गावकऱ्यांसाठी त्याचा शब्द अंतिम असतो. त्याने गावकऱ्यांना रोजगार दिल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उभे राहिले आहेत. त्यामुळे गावातील लोक त्याला देवासारखे मानतात.”

दरम्यान, अरुण नलावडे म्हणाले की, “मला मिळालेली भूमिका खूप वेगळी आहे. पालकांचे छत्र गमावलेल्या तीन नातींच्या आजोबांची भूमिका मी साकारत आहे. तिन्ही अभिनेत्रींसोबत माझी छान गट्टी जमली आहे. त्यांच्यात शिकण्याची प्रचंड धडपड आहे आणि मीही त्यांच्यासोबत शिकण्याचा प्रयत्न करत आहे.”‘आनंदी’ ही नवी मालिका ३० मार्चपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

49 मिनिटे ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

5 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

6 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

6 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

6 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

6 तास ago