मनोरंजन

‘मोहिनी’ची एन्ट्री! २३ मार्चपासून ‘कलर्स मराठी’वर नवी मालिका;

मुंबई: कलर्स मराठी वर येत्या काही दिवसांत दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून ऑन एअर होणार आहे. तर ‘मोहिनी’ या नव्या मालिकेची प्रदर्शनाची तारीख आणि वेळ वाहिनीने अधिकृतपणे जाहीर केली आहे.

“स्वाभिमान आणि अहंकाराच्या या लढाईत नेमकं कोण जिंकणार?” मोहिनी की RK? असा अनोखा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी ही मालिका मधुबाला – एक इश्क एक जुनून या लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असल्याची चर्चा केली आहे. ही मालिका २०१२ मध्ये कलर्स टीव्ही वर प्रसारित झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला होता.

‘मोहिनी’चा पहिला प्रोमो पाहिल्यानंतरही नेटकऱ्यांनी ही मालिका ‘मधुबाला’चा रिमेक असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांकडून या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणती मालिका संपू शकते?

‘मोहिनी’ ही मालिका २३ मार्चपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होणार आहे. सध्या या वेळेत जय जय स्वामी समर्थ ही मालिका दाखवली जाते. सध्या या मालिकेत स्वामी समर्थांच्या महानिर्वाणाचा भावपूर्ण अध्याय दाखवला जात असल्याने लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत वाहिनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

फ्रेश जोडी झळकणार

‘मोहिनी’ मालिकेत एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनघा ठाकूर मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे समीर घराघरांत पोहोचला होता. तसेच स्टार प्रवाह वरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

दरम्यान, मालिकेची लॉन्च डेट जाहीर होताच शर्वरी जोग, प्रतीक्षा मुणगेकर, समृद्धी केळकर, महिमा म्हात्रे, हृषिकेश शेलार आणि अभिषेक रहाळकर या कलाकारांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत ‘मोहिनी’च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

18 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

19 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

19 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

22 तास ago