मुंबई: गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर लग्नाची आनंदाची बातमी जाहीर केली आहे. या मालिकेत आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील एका खास क्षणाची खूशखबर शेअर केली आहे.
स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये अपूर्वा गोरेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या पात्राचं नाव होतं ईशा, जी अरुंधतीची धाकटी मुलगी असते. घराघरांत लोकप्रिय झालेल्या या भूमिका साकारलेल्या अपूर्वाने आता खऱ्या आयुष्यात लग्नाच्या वाटेवर पाऊल टाकलं आहे.
सोशल मीडियावर अपूर्वाने होणाऱ्या पतीसह फोटो शेअर केले आहेत. हिरव्या रंगाची साडी, गळ्यात नाजूक ठुशी आणि हातात गुलाबाचं फूल घेऊन तिने हटके फोटोशूट केलं आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे:
“ठरलं! चाफा आणि तो… मला खूप आवडतात…”
असे असले तरी, होणाऱ्या पतीचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर उघड केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये ‘तो’ कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पोस्टवर अनेक कलाकारांनी अपूर्वाला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात सुकन्या मोने, अश्विनी महांगडे, शुभंकर एकबोटे, ऐश्वर्या शेटे, अदिती द्रविड यांचा समावेश आहे. तसेच, तिच्या चाहत्यांनीही तिच्या आनंदाचा उत्साह व्यक्त केला आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अपूर्वा ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात ऐश्वर्या आणि अविनाश नारकरसोबत काम करत आहे. तिच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाची तारीख आणि ‘तो’ कोण आहे हे जाणून घेण्याची आतुरता आहे.
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…
महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…
मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…
१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…