मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील नागरिकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला; कारण…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात अजित दादांच्या राष्ट्रवादी कडून तृप्ती सरोदे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. परंतु, पक्षाने ऐन वेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतला. परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांनी शिवसेनेकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. काही करून निवडणूक लढविणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या तृप्ती सरोदे यांनी ‘भाजप’ ला दिलेल्या पाठिंब्यानंतर नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाल्याची चर्चा शिरूर तालुक्यात आहे.

शिवसेनेकडुन दाखल केलेली उमेदवारी मागे घेतल्यानंतर तृप्ती सरोदे नक्की कोणाला पाठिंबा देणार…? या चर्चांना काही दिवसांपुर्वी उधाण आले होते. सुरवातीला शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सरोदे यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर तृप्ती सरोदे यांनी ‘भाजपा’ ला पाठिंबा जाहीर केला. पण याचा फायदा भाजपाला होणार का…? हा मोठा प्रश्न आहे. कोणत्याच पक्षाशी एकनिष्ट नाही, ठाम भूमिका नाही, यामुळे सरोदे यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

आधी राष्ट्रवादी, नंतर शिवसेना आणि मग भाजपा…?
तृप्ती सरोदे यांनी प्रथम राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली. त्यानंतर शिवसेनेकडून ‘एबी’ फॉर्म घेत उमेदवारी अर्ज भरला आणि ऐन वेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अन नंतर भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने सरोदे यांच्याबद्दल सर्वसामान्य मतदारांच्या मनात सहानुभूतीची लाट तयार झाली होती. परंतु, त्यांनी उमेदवारी मागे घेत ज्या पक्षाने त्यांना ओळख दिली त्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याऐवजी ‘भाजपा’ ला पाठिंबा दिला.

शिवसेनेच्या भगव्याची शपथ नक्की गेली कुठे…?
राष्ट्रवादीने तृप्ती सरोदे सरोदे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर सरोदे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरोदे यांनी ‘मी तुम्हाला भगव्याची शपथ घेऊन सांगते, शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही.’ असा निर्धार केला होता. त्यांनी ऐन वेळी उमेदवारी मागे घेत ‘भाजपा’ ला पाठिंबा दिल्यामुळे सरोदे यांनी शिवसेनेचा भगवा फडकविण्याची जी शपथ घेतली होती. त्याचा तृप्ती सरोदे यांना विसर पडला असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरु आहे.

सर्वसामान्य लोकांना दुःख पण सरोदेचं समर्थन मात्र ‘भाजपा’ ला…
अजित पवार यांच्या अपघाती निधनाने पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात एक भावनिक लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे तृप्ती सरोदे यांनी उमेदवारी मागे घेतल्यावर साहजिकच त्या परत स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत परत येतील अशी भाबडी आशा सर्वसामान्य मतदारांना होती. शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसा प्रयत्नही केला. परंतु सरोदे यांना अजित पवार यांच्या निधनापेक्षा आणि ज्या पक्षाने त्यांना ओळख दिली. त्यापेक्षाही स्वतःचा ‘इगो’ मोठा वाटल्याने त्यांनी ‘भाजपा’ ला साथ दिली, असे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तृप्ती सरोदे यांनी ‘भाजपा’ ला पाठिंबा दिल्याने सर्वसामान्य मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.

शिरूर! राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारताच तृप्ती सरोदे यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; राष्ट्रवादीच्या तृप्ती सरोदे मात्र ‘प्रचारात’ आघाडीवर

शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात ‘शांतता’; तृप्ती सरोदे मैदानात तर बाकी उमेदवार…

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

4 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

11 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

11 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

11 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

12 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

12 तास ago