मनोरंजन

बिग बॉस मराठी ६! दिपाली–रुचिता यांच्यात तुफान वाद; ‘मी नव्हते ती’ म्हणत दिपालीचा संताप

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, घरातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उघडपणे समोर येत असून, नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने घरात खळबळ उडवून दिली आहे.या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, हा वाद इतका टोकाला गेला की संपूर्ण घर अवाक झालं आहे.

वादाचं नेमकं कारण काय?

प्रोमोमध्ये रुचिताने आरोप केला आहे की, दिपालीने इतर सदस्यांसमोर तिच्याबाबत एक गंभीर विधान केल्याचं तिने ऐकलं होतं. रुचिताच्या मते, दिपालीने “रुचिता तू RB ला टच केलं” असं स्टेटमेंट केल्याचं सांगितलं जातंय.मात्र, या आरोपांवर दिपाली चांगलीच भडकलेली दिसते. ती वारंवार ठामपणे म्हणते,“मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती! मी नव्हते ती!”यावर रुचिता देखील मागे न हटता आक्रमक होताना दिसते.

संवादामुळे तणाव शिगेला

वाद वाढत असताना दोघींमध्ये खालीलप्रमाणे तीव्र संवाद रंगतो

रुचिता: हिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू RB ला टच केलं.

दिपाली: मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती!

रुचिता: अंगावर चढू नकोस…

दिपाली: तू बोट खाली कर… एक मरेन

रुचिता: हा चल मार!

बोट दाखवणं, अंगावर येणं आणि आवाज चढवणं यामुळे हा वाद अधिकच उग्र बनतो. या घटनेमुळे घरातील इतर सदस्यही गोंधळून गेले असून, कोणाची बाजू घ्यावी हे त्यांनाही कळेनासं झालं आहे.

घरातील समीकरणं बदलणार?

बिग बॉसच्या घरात दररोज बदलणारी समीकरणं आणि वाढता तणाव पाहता, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा संघर्ष घराचं वातावरण पूर्णपणे बदलून टाकणार का, की हा वाद आणखी मोठं वळण घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.या सगळ्या नाट्यमय घडामोडींचा उलगडा आजच्या भागात होणार असून, प्रेक्षकांसाठी हा भाग नक्कीच उत्सुकतेचा ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

12 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

18 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

18 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

19 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

19 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

19 तास ago