मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी दिलेल्या मुलाखतींमधून अनेक पडद्यामागील गोष्टी समोर आल्याने जुने स्पर्धकही पुन्हा चर्चेत आले आहेत. अशातच चौथ्या सीझनमधील स्पर्धक तृप्ती देसाई यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या सीझनमधील एक खास आठवण सांगितली. त्यांच्या मते, बिग बॉसच्या घरातील त्यांचा मोठा आवाज ऐकून बॉलिवूड अभिनेता सलमान खाण यांनी थेट दिग्दर्शक आणि होस्ट महेश मांजरेकर यांना फोन केला होता. ही गोष्ट महेश मांजरेकर यांनी मिश्किलपणे सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हटलंय तृप्ती देसाईंनी?
महेश मांजरेकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत तृप्ती देसाईंनी लिहिलंय,“बिग बॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून सलमान खान यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता… आमच्या सीझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकंच खरं आहे. ते घर आहे… तिथे माणुसकी, नाती जपणं, टास्क खेळणं, कोणालाही जेवण कमी पडू न देणं हे सर्व पाहणं गरजेचं आहे आणि आम्ही हे सर्व जपण्यात यशस्वी झालो होतो. आम्ही ‘रील स्टार’ म्हणून नाही तर ‘रिअल स्टार’ म्हणून त्या सीझनमध्ये सहभागी झालो होतो, याचा प्रचंड अभिमान आहे.”
‘रील स्टार्स’वर अप्रत्यक्ष टीका?
सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि तथाकथित ‘रील स्टार्स’ सहभागी झाले आहेत. त्यामुळे तृप्ती देसाई यांची पोस्ट ही सध्याच्या स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका असल्याचं मानलं जात आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली असून काहींनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी सध्याच्या स्पर्धकांचं समर्थन करत बदलत्या काळानुसार शोचं स्वरूप बदलणं स्वाभाविक असल्याचं म्हटलं आहे. परिणामी, ‘रिअल विरुद्ध रील’ असा नवा वाद रंगताना दिसत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…