मनोरंजन

रितेशचा देशमुख संताप! नियम मोडणाऱ्या प्रभू शेळकेला भाऊचा धक्का…

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये रेशन कार्ड टास्कमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गोल्डन, सिल्व्हर आणि ब्राँझ अशा रेशन कार्डच्या नियमांनुसार घरातील सदस्यांना सुविधा दिल्या जातात. मात्र, या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने बिग बॉसने संपूर्ण घरावर ब्राँझ रेशन कार्ड लागू केलं.यामुळे कॅप्टन आयुष वगळता सर्व सदस्यांना जमिनीवर झोपावं लागलं, तर १६ सदस्यांसाठी फक्त एकच वॉशरूम उपलब्ध झालं. या कठोर नियमांमुळे घरात अस्वस्थता वाढली.

दरम्यान, छोटा डॉन प्रभू शेळके याच्याकडून वारंवार नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. याच पार्श्वभूमीवर रितेश देशमुखने ‘भाऊच्या धक्क्यावर’ प्रभूला जाब विचारला. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश स्पष्ट शब्दांत प्रभूला सुनावतो.

रितेश म्हणतो,“प्रभू, तुम्ही स्वतः म्हणालात तुम्ही २० वर्षांचे आहात. दोन आठवडे तुमचे लाड झाले, कौतुक केलं. पण आता तुम्ही लाडात आला आहात, उद्धटपणे वागताय, नियम मोडताय… आता बास!”

प्रभू शेळकेचं वय किती

प्रोमोमध्ये रितेशने स्पष्ट केल्याप्रमाणे प्रभू शेळके सध्या २० वर्षांचा आहे.या प्रोमोवर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.“फायनली भाऊ बोलले!”, “बरं झालं याला असंच पाहिजे”, “उद्धट वागणं थांबायला हवं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.आता पुढील भागांमध्ये प्रभूच्या वागण्यात बदल होणार का, की भाऊचा धक्का आणखी तीव्र होणार—याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago