मनोरंजन

टास्क नाकारल्याची मोठी किंमत! ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर?

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात एलिमिनेशनचा थरार चांगलाच वाढला असून, सोनाली राऊत घराबाहेर पडल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. या आठवड्यात घरातील एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामदार हे सदस्य नॉमिनेशनमध्ये होते.

तिसऱ्या आठवड्यात घरात ‘मिस्टर इंडिया’ नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कदरम्यान अनेक स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. घराचा कॅप्टन आयुष संजीव असल्यामुळे तो या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित होता. या टास्कमधून एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले.

दरम्यान, आठवी नॉमिनेटेड सदस्य सोनाली राऊत हिला ‘बिग बॉस’ने थेट नॉमिनेट केलं होतं. आदल्या आठवड्यात ‘शेणाचं दार अन् मेणाचं दार’ हा पॉवर कीसाठीचा टास्क खेळण्यास सोनालीने कपडे घाण होतील या कारणावरून स्पष्ट नकार दिला होता. यावरून ‘बिग बॉस’ने तिच्यावर थेट कारवाई करत तिला नॉमिनेट केलं. याच मुद्द्यावर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनीही सोनालीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती.

अखेर हा निर्णय सोनालीला चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार सोनाली राऊत घराबाहेर गेल्याचं वृत्त समोर येत आहे. तिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास इतक्या लवकर संपेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांनी केलेली नव्हती. त्यामुळे या अनपेक्षित एव्हिक्शनमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

व्होटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत आणि सोनाली राऊत बॉटम-२ मध्ये होते. मात्र दिव्या शिंदेच्या चाहत्यांनी ओमकार राऊतला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनाली राऊत घराबाहेर झाल्याच्या चर्चा अधिक बळावल्या आहेत.

या सर्व चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये होणार असून, प्रेक्षकांना नेमकं काय घडलं याची स्पष्टता तेव्हाच मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago