आरोग्य

रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

लोक अनेकदा उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथीच्या बियांचं पाणी पितात. पण अनेक लोकांच्या मनात असाही प्रश्न पडतो की, उपाशीपोटी आंबट फळांचे ज्यूस प्यावे की नाही? यावर अनेक एक्सपर्ट सांगतात की, संत्री, आवळा, मोसंबीचा ज्यूस उपाशीपोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतात. कारण या फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे पोटासाठी योग्य नाही. अशात सकाळी उपाशीपोटी आंबट फळांचा ज्यूस पिऊन कोणत्या समस्या होतात हे पाहुयात.

आंबट फळांचा ज्यूस पिण्याचे नुकसान

छातीत जळजळ आणि अ‍ॅसिडिटी

लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी फळं अ‍ॅसिडी क असतात. जेव्हा आपण उपाशीपोटी यांचा ज्यूस पितो, तेव्हा पोटात अ‍ॅसिडचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते.

गॅस्ट्रायटिसचा धोका

पोटात अ‍ॅसिडिटी वाढल्यानं पोटाच्या आतील थरात जळजळ होऊ शकते. जर ही समस्या जास्त दिसत राहत असेल तर गॅस्ट्रायटिसची समस्या होऊ शकते. खासकरून अशा लोकांना ज्यांना आधीच पोटासंबंधी समस्या असतात.

ब्लड शुगर वाढते

भलेही या ज्यूसमध्ये वरून साखर टाकलेली नसेल तरीही नॅचरल शुगर असतेच. त्यामुळे उपाशीपोटी जर हे ज्यूस प्याल तर अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. ज्यानंतर थकवा आणि कमजोरी जाणवते.

दातांचं नुकसान

आंबट फळांमधील अ‍ॅसिडनं दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. दात कमजोर होतात. तसेच दातांना किड लागण्याचा आणि झिणझिण्या येण्याचा धोका असतो.

उपाशीपोटी काय फायदेशीर

जर आपल्याला आंबट फळांचा ज्यूस प्यायचा असेल तर जेवणासोबत किंवा जेवणानंतर प्यावा. असं केल्यानं पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण कमी होतं आणि जळजळ होण्याचा धोकाही कमी होतो. उपाशीपोटी आपण कोमट पाणी किंवा लिंबू पाणी (लिंबाचा रस कमी टाकलेलं) पिऊ शकतात. यानं शरीर हायड्रेट राहतं आणि डिटॉक्सही होतं. ज्या लोकांना गॅस्ट्रायटिस किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्ससारखी समस्या असेल तर त्यांनी सकाळी उपाशीपोटी आंबट फळं किंवा त्यांचा ज्यूस पिणं टाळलं पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago