मनोरंजन

शिरूर तालुक्यातील हरहुन्नरी कलाकार सचिन शिंदे झळकणार मराठी चित्रपटात…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे कलावंताच गाव आहे. बी, के. मोमीन, तमाशा चालक व कलावंत गंगारामबुवा रेनके कवठेकर, विठ्ठल कवठेकर, कवी चंदुलाल, दत्तोबा कवठेकर यांनी गाणी रचून तमाशा पंढरी महाराष्ट्रभर चालवली. मोहन पडवळ हा चित्रपटासाठी लेखन करत असून आता त्याच गावातील हरहुन्नरी कलाकार,अभिनेता सचिन अर्जुन शिंदे हे लवकरच ‘तुझं वेड लागलं ‘ या मराठी चित्रपटात विशेष सह कलाकार म्हणून भूमिका साकारताना पाहावयास मिळणार आहेत.

अभिनेता सचिन अर्जुन शिंदे यांना शीतल फिल्म्स प्रॉडक्शन, मुंबई यांचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. मराठी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सचिन शिंदे या हुरहुन्नरी कलाकाराची प्रथमच निवड झाल्याने कवठे येमाईत त्यांच्या चाहत्यामधून व तरुण वर्गात जल्लोष साजरा होत आहे. अत्यंत जेमतेम परिस्थितीत शिक्षण घेतलेले सचिन शिंदे यांना अगदी लहानपणापासूनच छोटे मोठे अभिनय, फोटोग्राफी, भूमिका, उत्कृष्ठ निवेदक म्हणून काम करण्याची आवड असल्याने ते सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या पटकथांमध्ये ही सर्वांग सुंदर अभिनयाच्या भूमिका यशस्वीपणे साकारताना रसिक प्रेक्षकांची मने जिकंलेली आहेत.

गरीब मुलांनी ही शाळा शिकावी म्हणून त्यांनी त्यांच्या वस्तीवर सायकलवर जाऊन समाजप्रभोधनरुपी शिक्षकाची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली आहे. आपल्याकडे असलेल्या कला अविष्कारावर नितांत प्रेम करीत जोपासना करणारे ग्रामीण कलाकार सचिन शिंदे यांची आता चित्रपटात काम करण्यासाठी निवड झाल्याने त्यांनी घेतलेल्या अखंड मेहनतीस त्यांना फळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. त्यांचा मित्रवर्ग व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत त्यांना आगामी चित्रपटातील अभिनयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला व्यक्ती एकच आहे का

देवमाणूस! अभिनेता किरण गायकवाड याचे शुभमंगल सावधान!

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

रविंद्र महाजनी यांचा टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेते प्रवास…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

9 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

3 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

4 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

4 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

4 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

4 दिवस ago