मुंबई : देवमाणूस या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. किरणने काही दिवसांआधीच प्रेमाची कबूली दिली होती. किरण गायकवाड याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्याबरोबर लग्न केलं आहे. किरणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. किरणच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. किरणला चाहत्यांनी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर या ऑनस्क्रिन जोडीने ऑफस्क्रिन देखील एकत्र येण्याचा निर्णय घेतला. देवमाणूस 2 या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान दोघांचे प्रेम जमले असा अंदाज चाहते लावत आहेत.
किरण आणि वैष्णवी अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नात किरणने व्हाइट कलरची शेरवानी आणि डोक्यावर व्हाइट कलरचा फेटा घातला होता. तर नवरी बनलेल्या वैष्णवीने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. किरण आणि वैष्णवी यांच्या लग्नाआधीचे सर्व विधी धुमधडाक्यात पार पडले. दोघांच्या लग्नाला देवमाणूस मालिकेची संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. संगीत सोहळ्यात किरण आणि वैष्णवी यांनी डान्स करत लक्ष वेधले. अभिनेता किरण गायकवाडची घोड्यावरून वरात काढण्यात आली होती.