जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन व्यवहार निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग असून त्यातून लाभ होईल. मात्र दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा व वाद टाळा. संध्याकाळी पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढू शकतो.

वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी होईल. शुभ कार्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक खर्च संभवतो. कुटुंबीयांचा पाठिंबा लाभेल. व्यवसायात व्यापाऱ्यांशी मतभेद संभवतात, मात्र तुमच्या कौशल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. रागावर नियंत्रण ठेवा.

मिथुन: मिथुन राशीसाठी दिवस काहीसा आव्हानात्मक आहे. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणाला आर्थिक मदत देणे टाळा. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.

कर्क: कर्क राशीसाठी दिवस अत्यंत उत्तम आहे. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. मालमत्तेशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराची साथ लाभेल. दानधर्मातून मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम असल्याने गुंतवणुकीचा विचार करू शकता.

सिंह: सिंह राशीसाठी दिवस संमिश्र फल देणारा आहे. समाजातील प्रतिमा उंचावेल. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कायदेशीर प्रश्नांवर तोडगा निघेल. महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा.

कन्या: कन्या राशीसाठी दिवस लाभदायक आहे. धनलाभाचे योग आहेत. कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्याने ताण जाणवेल, मात्र वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. घरातील प्रश्न सुटल्याने समाधानाचे वातावरण राहील.

तूळ: तूळ राशीसाठी आज सावध राहण्याची गरज आहे. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. सामाजिक प्रतिष्ठेसाठी काही खर्च करावा लागेल.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस साधारण आहे. कामात नियोजन व व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल. अधिकार वाढल्याने काही सहकारी नाराज होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करा. इतरांना मदत केल्याने मनःशांती मिळेल.

धनु: धनु राशीसाठी दिवस फारसा अनुकूल नसला तरी समस्यांवर उपाय सापडतील. नोकरीत बदलाचे संकेत आहेत. घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते. संयमाने वागल्यास परिस्थिती सुधारेल. प्रियजनांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल.

मकर: मकर राशीसाठी दिवस ठीक आहे. नवीन व्यवहारातून धनलाभ संभवतो. आर्थिक स्थिती सुधारत असल्याने बचतीकडे लक्ष द्या. मित्रांनी सुचवलेल्या योजनांपासून दूर राहा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

कुंभ: कुंभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. एखाद्या कामात उल्लेखनीय यश मिळेल. आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होतील. घरातील वाद कमी होतील.

मीन: मीन राशीसाठी दिवस शुभ आहे. कठोर परिश्रमांचे फळ मिळेल. दिवस आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. ऑफिसमध्ये मान-सन्मान वाढेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

17 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago