मुख्य बातम्या

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात महिलांनी दुकानदाराची नजर चुकवत तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव गणपती येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात असताना चार अनोळखी महिला दुकानात आल्या. त्यांनी चांदीचे जोडवे खरेदी करायचे असल्याचे सांगत विविध प्रकारचे दागिने दाखविण्याची मागणी केली. ग्राहक असल्याचे भासवत या महिलांनी बराच वेळ वेगवेगळ्या डिझाइनचे जोडवे पाहिले. वारंवार नवीन दागिने दाखविण्यास सांगत त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले.

काही वेळानंतर कोणतीही वस्तू खरेदी न करता चारही महिला दुकानातून निघून गेल्या. महिला गेल्यानंतर दुकानाचे मालक प्रणय दिलीप वर्मा (वय ३०, रा. भांबर्डे रोड, रांजणगाव गणपती) यांनी दागिने आणि वस्तूंची पाहणी केली. त्यावेळी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दुकानात आलेल्या महिलांनी हातचलाखी करुन दागिने चोरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत प्रणय वर्मा यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरोधात फिर्याद दिली आहे. दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित महिलांचा शोध घेण्यात येत आहे.

भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे रांजणगावसह परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दुकानात येणाऱ्या संशयास्पद ग्राहकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासह मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार अमित चव्हाण हे करत आहेत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

8 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

8 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

8 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

8 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

9 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

10 तास ago