मुख्य बातम्या

शिरूर बसस्थानकात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याचे गंठण लंपास

गर्दीचा फायदा घेत अनोळखी महिला चोरटीचा डाव; ९४ हजारांच्या दागिन्यावर डल्ला, गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदुपारी गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिला चोरट्याने ११ ग्रॅम वजनाचे सुमारे ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता अशोक राऊत (वय ५०, रा. साईस्वराज्यनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या ८ जुलै रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास शिरूर बसस्थानकात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण अत्यंत चलाखीने चोरून नेले.

घटना लक्षात येताच अनिता राऊत यांनी तातडीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिला चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करून दागिने चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, बसस्थानक, बाजारपेठ आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने व वस्तूंची विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? लोखंडी गजांच्या वापराबाबतही संशय, नागरिकांचा संताप अनावर…

शिक्रापूर (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा सुरूच असून, रस्ता…

6 तास ago

शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…

शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची…

1 दिवस ago

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर…

2 दिवस ago

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…

3 दिवस ago

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

3 दिवस ago

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…

3 दिवस ago