मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

न्हावरे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील २१ वर्षीय युवती कोणालाही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून कुटुंबीयांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संध्याकाळी युवतीचे आई-वडील बाजारासाठी बाहेर गेलेले असताना त्यांची हि घरीच होती. ते घरी आल्यानंतर त्यांची मुलगी कुठेच दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र ती कुठेही मिळाली नाही.”

या २१ वर्षीय बेपत्ता युवतीचे वर्णन पुढीलप्रमाणे रंग गोरा, उंची ५ फुट ४ इंच, काळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीज, पायात लालसर-हिरव्या रंगाची चप्पल तसेच उजव्या गालावर जुन्या जखमेची खूण आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत. जर कुणाला संबंधित मुलगी दिसल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरुर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन या युवतीच्या कुटुंबीयांनी केले आहे.

शिरुर तालुक्यातील आलेगाव पागा येथून दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता; कुटुंब चिंतेत

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड

शिरुर तालुक्यातील छेडछाड प्रकरणी डायल ११२ ला कॉल पण शिक्षकावर कारवाई कधी…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago