मुख्य बातम्या

शिरुर पोलिसांची मोठी कारवाई 650 किलो गोमांस जप्त करत दोन जणांना अटक

शिरुर (तेजस फडके) पुण्यातून अहमदनगरला गोमांस विक्रीसाठी येणार असल्याचे शिरुर पोलिसांना पुणे ग्रामीण कंट्रोल वरुन कळवले. त्यामुळे शिरुर पोलिसांनी तातडीने हालचास करत आज (दि 23) रोजी पहाटे 4:30 च्या सुमारास पुणे-नगर रोडवर सतरा कमान पुल इथं नाकाबंदी करत अंदाजे 650 किलो गोमांस वाहतुक करणाऱ्या गाडीसहित दोन जणांना अटक केली असुन 1) शाहरुख इसुफ खान (वय 29), 2) समीर अब्दुल गणी शेख (वय 21) रा. गोविंदपुरा मुकुंद नगर ,अहमदनगर असे अटक केलेल्या व्यक्तींची नाव आहेत. याबाबत पोलीस अंमलदार अशोक भगवान चितारे यांनी फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण कंट्रोलने शिरुर पोलिसांना एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातुन गोमांस अहमदनगर येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचा मेसेज मिळाला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शिरुर येथील सतरा कमान पुलाजवळ नाकाबंदी केली. यावेळी पहाटे 4:30 च्या सुमारास पुण्याहुन-नगरकडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉपिओ क्रं एम एच 12 ई एक्स 7158 मधुन अंदाजे 650 किलो 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे विक्रीसाठी जाणारे गोमांस जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार विनोद काळे, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार राजू मांगडे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago