crime
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका हॉटेल मध्ये पाच जणांनी बेकायदा जमाव जमवून दोन युवकांना जबरदस्ती रिक्षात बसवुन रांजणगाव औद्योगिक वसाहती (Ranjangaon MIDC) मधील मोकळ्या जागेतील एका कंपनीच्या आवारात नेऊन दोन युवकांना हाताने, लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच कोयते, कुर्हाडी, हातात घेऊन हवेत फिरवून आरडाओरड करुन दहशत माजवत एक दुचाकी जाळणाऱ्या पाच जणांविरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील बाजारतळात एका हॉटेल मध्ये रणजीत शितोळे, तेजस शितोळे, धनंजय शिरपुरे, रोहन बोटे, शंकर करंजकर तसेच इतर तीन इसम (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी बेकायदेशीर जमाव जमा करुन फिर्यादी आनंद लक्ष्मण खाडे (वय 19) आणि त्याचा मित्र अक्षय कुठे याला ‘तुला माहित आहे का मी कोन आहे ते…?’ असे म्हणुन जबरदस्तीने त्यांच्याकडे असलेल्या रिक्षा मध्ये बसवत रांजणगाव एमआयडीसी (MIDC) मधील मोकळ्या जागेतील कंपनीच्या आवारात नेऊन फिर्यादी व त्याच्या मित्राला हाताने लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच परिसरामध्ये त्यांनी कोयते, कुर्हाडी, हातात घेऊन हवेत फिरवत आरडाओरड करुन दहशत माजवत एमआयडीसी (MIDC) मधील वरद कंपनी जवळ लावलेल्या पाच दुचाकींची तोडफोड करुन त्यापैकी एक दुचाकी जाळून नुकसान केले.
त्यामुळे आनंद लक्ष्मण खाडे (वय 19) वर्ष, सध्या रा.कारेगाव, शिवमल्हार बिल्डिंग, ता.शिरुर, जि.पुणे मुळ रा.जामगाव, खाडे वस्ती, ता.पारनेर जि.अहमदनगर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे रणजीत शितोळे, तेजस शितोळे, धनंजय शिरपुरे, रोहन बोटे, शंकर करंजकर तसेच इतर तीन इसम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे करत आहेत.
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा…
शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी…
पाबळ (सुनिल जिते) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती झाल्याने तयारी सुरु झाली…