मुख्य बातम्या

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाट गावच्या हद्दित मंगळवार (दि २७) रोजी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाला. सकाळी ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शिरुर वनविभागाला याबाबत माहिती दिली.

गुनाट-निर्वी गावच्या शिवेजवळ फंड वस्तीनजीक पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत पावल्याचे समजल्यानंतर मंगळवार (दि २७ ) सकाळी ग्रामस्थांनी याठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर काही वेळात शिरुर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

 

त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृत बिबट्याला वाहनातुन शिरुरच्या दिशेने नेण्यात आले. मृत बिबट्या अंदाजे ४ ते ५ वर्षे वयाची मादी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासुन या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांची जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. विशेषत: बकऱ्यांना बिबट्याने लक्ष केले होते. त्यामुळे गुनाट परीसरात घबराट पसरली होती.

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

11 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

18 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

20 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

20 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

20 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago