शिरूर तालुका

मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबातील तीन भावंडांनी शाळेसाठी केली लाखों रुपयांची जमीन दान

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथील जगतापवाडी तील तीन भावंडांनी गोर-गरीबांच्या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शाळेला तब्बल सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केली आहे. मांडवगण परीसरात शेत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना शाळेसाठी सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केल्याने जगताप कुटुंबियांवर आसपासच्या परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

जगतापवाडी हा परिसर मांडवगण फराटा गावापासून तीन ते चार किलोमीटर लांब आहे. येथील मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गावात यावे लागत होते. शेतमजुरांच्या मुलांसह गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी येथील शेतकरी राजेंद्र पोपटराव जगताप, संजय पोपटराव जगताप व कांतीलाल पोपटराव जगताप या तीन भावंडांनी आजोबा स्वर्गीय बयाजी शंकरराव जगताप आणि वडील स्वर्गीय पोपटराव बयाजी जगताप यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी सात गुंठे जमीन दान केली आहे.

 

मांडवगण फराटा येथील जगतापवाडी हा परीसर बारमाही बागायती आहे. ऊस, कांदा, कापुस, डाळींब, केळी, खरबुज, कलिंगड हि पिके येथे चांगल्या प्रकारे पिकत आहेत. येथील जमिनींना साधारणतः तीस ते चाळीस लाख रुपयांचा एकरी बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे लाखो रुपयांची जमीन दान केल्याने या भावंडांचे कौतुक होत असुन या कुटुंबाचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

मांडवगण फराटा गावच्या सरपंच समिक्षा कुरुमकर, उपसरपंच पांडुरंग मोरे. अशोक जगताप, प्रतिक्षा जगताप, प्रविण जगताप, सोमनाथ जगताप, प्रविण शितोळे, मुख्याध्यापक थोरात व जगताप कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

रांजणगाव गणपती; मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना, पोलिस निरीक्षक अनिता खेडकर

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago