मुख्य बातम्या

गुनाटच्या दत्तभुमीतुन भक्तीचा जागर; दत्त परिक्रमेस ऐतिहासिक प्रारंभ

शिंदोडी (तेजस फडके): गेल्या अनेक दशकांपासुन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातुन दत्तभक्तीचा नवा अध्याय सुरु झाला असुन, येथील ग्रामदैवत श्री दत्त मंदिरातून दत्त परिक्रमेस भक्तिभावपूर्ण आणि मंगल वातावरणात ऐतिहासिक सुरुवात करण्यात आली.

गुनाट येथील श्री दत्त मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, २०१८ साली ग्रामस्थांच्या एकजुटीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. भव्य-दिव्य रचना आणि सव्वा सहा फूट उंचीची आकर्षक दत्तमूर्ती गावाच्या वैभवात भर घालत असून, दररोज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

गावामध्ये गेल्या ३३ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु असुन, दर गुरुवारी व पौर्णिमेच्या दिवशी महाआरती तसेच दररोज हरिपाठाचे आयोजन होत असल्याने गुनाट गाव संपूर्ण परिसरात धार्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे.

या भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत अभियंता दिपक करपे यांनी दत्त परिक्रमेची संकल्पना मांडत ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. त्यांच्या या संकल्पनेस कृषी अधिकारी जयवंत भगत, सतीश कोळपे, अनिल करपे, गोरख धुमाळ, संतोष भोस, महेश भैरट, कांतीलाल भगत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

गुरुवार दि १ जानेवारी २०२६ रोजी श्री दत्त मंदिरात विधीवत पूजा व महाआरती करुन मंदिरातील पादुका घेऊन दत्त परिक्रमेस प्रारंभ करण्यात आला. या परिक्रमेमध्ये सांगली जिल्ह्यातील मोराळे व औदुंबर, कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, कर्नाटकातील गाणगापूर, नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या प्रमुख दत्त तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

या परिक्रमा प्रस्थानावेळी विष्णु करपे, ह.भ.प. विठ्ठल महाराज भगत, योगेश गाडे तसेच माजी सरपंच गहिनीनाथ डोंगरे, ॲड. गणेशराव करपे, सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी कल्याण करपे, पोलीस पाटील हनुमंत सोनवणे, विजय गाडे, तुषार भगत, संतोष भोरडे, संतोष भगत, तानसेन करपे, महेश गाडे, सचिन करपे, श्यामकांत गोरडे, सतीश डोंगरे, वैभव करपे, सतीश सोनवणे आदी दत्तभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या नाविन्यपुर्ण आणि प्रेरणादायी दत्त परिक्रमेमुळे गुनाट गावाची ओळख धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होत असून, परिसरातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

7 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

7 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

7 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

11 तास ago