शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश महाधू फटांगडे (वय अंदाजे ३८ वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश फटांगडे हे शर्यतीदरम्यान गाडा अंगावर आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, शिक्रापुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत शर्यतीचे आयोजन नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शर्यतीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, नियंत्रण व्यवस्था तसेच नियमांचे पालन करण्यात आले नव्हते, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिक्रापुर पोलिस स्टेशन तक्रारीनुसार, संबंधित आयोजक व जबाबदार व्यक्तींनी आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे निष्काळजीपणा झाला असुन, त्यातूनच प्रकाश फटांगडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अशा शर्यतींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिक्रापुर पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरु केला असून, सर्व बाजूंनी चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार
न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…