मुख्य बातम्या

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर न्यायालयाच्या आवारात शिरुर तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने दारु पिऊन धिंगाणा घालुन शिविगाळ करण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्यायालयासमोर मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना (दि १८) जुलै रोजी घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे दिसून येत आहे.

 

याबाबत सविस्तर माहीती अशी की, एका २२ वर्षीय महीलेचे (रा. श्रीरामपुर, जि.अहिल्याअनगर सध्या रा. शिक्रापुर, ता.शिरुर, जि. पुणे) लग्न २०२० साली राजेंद्र जाधव यांच्यासोबत झाले असुन ती सध्या त्याच्या सोबत राहात नसुन ती आई-वडील यांच्याकडे राहण्यास असते.

 

गुरवार (दि १८) जुलै रोजी ती तिच्या घटस्फोटाच्या केस संदर्भात शिरुर न्यायालयात दुपारी ५ च्या दरम्यान तिच्या ओळखीचा विजय मछिंद्र निकम (रा. श्रीरामपुर,दत्तनगर, ता. श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर) या मित्रासोबत आली होती. कोर्टात यायला वेळ लागल्याने ती त्याला अजुन थोडा वेळ थांब असे म्हणाली असता त्याने रागाच्या भरात तिला कोर्टाच्या बाहेरील आवारात गालावर चापट मारुन मारहाण केली.

 

त्यावेळी तिथे आसपासचे लोक जमा झाले. त्यानंतर तेथील पोलीस व वकील तिला व विजय याला बाजुला घेवुन गेले. थोडया वेळात महीला पोलीस व इतर पोलीस तेथे आले व त्यांच्या सोबत ती शिरुर पोलीस स्टेशन येथे आले. तिच्या ओळखीचा विजय मछिंद्र निकम (रा. श्रीरामपुर,दत्तनगर, ता. श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर) याने रागाचे भरात मला चापट मारली असुन माझी त्याच्या विरुद्ध काहीएक तक्रार नसल्याचा जबाब तिने शिरुर पोलिस स्टेशन येथे दिला आहे. त्यामुळे विजय याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये खटला भरुन कारवाई करण्यात आली आहे.

 

याबाबत शिरुर पोलीस स्टेशनच्या बेजबाबदार, भोंगळ कारभारावर शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वसामान्य नागरिक नाराज असून शिरुर पोलीस स्टेशन येथे सक्षम अधिकारी यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना शिरुर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी कि शिरुर पोलिसांची तक्रार करावी असा प्रश्न पडलेला आहे अशी खोचक प्रतिक्रिया अ‍ॅड सुमित देवीदास पोटे यांनी दिली आहे.

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

3 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

3 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

3 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

3 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

8 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

8 तास ago