मुख्य बातम्या

कृषी सहायक जयवंत भगत ग्रामोन्नती कृषी सन्मान 2023 पुरस्काराने सन्मानित…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी, धुमाळवाडी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी येथे कार्यरत असलेले कृषी सहायक जयवंत भगत यांना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे, कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील व कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन अनिल मेहेर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव” यांच्या वतीने ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार 2023 कृषी महोत्सव कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

गुनाट येथील कृषी सहायक जयवंत भगत यांनी अतिरिक्त पदभार असतानाही कृषी विभागाकडुन प्राप्त लक्षांक पुर्तता केली असून शेतकऱ्यांना अनेक गावात त्यांच्या कामाचा फायदा झालेला दिसुन येत आहे. तसेच युवक शेतकऱ्यांना शेतीची आवड निर्माण करणे त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहीत करणे आणि उत्पादन वाढविणे हे त्यांचे लक्ष असुन या कामी शेतकरी त्यांना भरभरून प्रतिसाद देत असल्याचे दिसुन येत आहे. विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी चर्चासत्र बैठका तसेच प्रत्यक्ष शेतावर बांधावर जाऊन तंत्रज्ञानाचा ते मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार करत असुन त्यांना तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे, मंडळ कृषी अधिकारी रोहीणी गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच महादेव गदादे सह तालुक्यातील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक सहकार्य करत आहेत.

कृषी सहायक जयवंत भगत हे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देताना, योजनांचा प्रचार प्रसार करताना शेतकऱ्यांच्या सोईनुसार ते वेळ देत असुन शेतकऱ्यांचे जो पर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते काम करतात अशाच प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांनी दिल्या. नारायणगाव येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यासाठी निर्वी येथील निलेश सोनवणे, विजय रोडे संजय काटे, शरद पवार, दत्तात्रय सोनवणे, प्रफुल्ल सोनवणे निमोणे येथुन संतोष काळे, अशोक गाजरे, तळेगाव ढमढेरे येथुन उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, अनिल दंडवते, जांबुत येथून अनिल जगताप तर गुनाट येथुन योगेश गाडे, विठ्ठल भगत, दत्तात्रय भगत, गितांजली भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago